एसटी बसस्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 13 "बस पोर्ट'ची उभारणी करण्यात येणार आहेत. त्यातील 9 "बस पोर्ट'चा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे दिली. 

"बस पोर्ट'च्या आराखड्याचे सादरीकरण आज रावते यांच्या दालनात झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. 

रावते म्हणाले, राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्याचे काम शासनाने ठरविले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटी सेवेचा लाभ घेतात. मात्र, बसस्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे गैरसोय होते. शासनाने विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयी-सुविधा, व्यापारी संकुल, रेल्वे स्थानकाला जोडण्यासाठी स्काय वॉक, शॉपिंग सेंटर आदींचा समावेश असणारे "बस पोर्ट' उभारण्याचे ठरविले आहे. सध्याच्या एसटी स्थानकाच्या जागेचा पुरेपूर वापर करून "बस पोर्ट' व व्यापारी संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
राज्यातील एकूण 13 स्थानकांची "बस पोर्ट'साठी निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात बोरिवली- नॅन्सी कॉलनी, पनेवल, शिवाजीनगर (पुणे), पुणे नाका बसस्थानक (सोलापूर), नाशिकचे महामार्ग बस स्थानक, औरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, नांदेडचे मध्यवर्ती बसस्थानक, अकोला मध्यवर्ती बसस्थानक व नागपूरच्या मोरभवन बसस्थानकाचा समावेश आहे. या सर्व बसस्थानकांची रचना एकसारखीच असणार आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून त्याची उभारणी करण्यात येणार असून, त्याची देखभाल व दुरुस्तीही बसस्थानक उभारणारी संस्थाच करणार आहे, असे रावते यांनी सांगितले. 
 
Web Title: st stands to be rennovated