दुसऱ्यादिवशीही एसटी पंक्चरच !

शनिवार, 9 जून 2018

आज दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या अघोषित संपामुळे एसटी पंक्चर होती. आज झालेल्या संपात एसटीचा सुमारे 18 कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. गेल्या दोन दिवसापासून एसटीला तब्बल 33 कोटी रूपयांचा फटका बसला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत शिवशाही बसचे 25 लाखांचे नुकसान झाले.

मुंबई - आज दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या अघोषित संपामुळे एसटी पंक्चर होती. आज झालेल्या संपात एसटीचा सुमारे 18 कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. गेल्या दोन दिवसापासून एसटीला तब्बल 33 कोटी रूपयांचा फटका बसला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत शिवशाही बसचे 25 लाखांचे नुकसान झाले.संप मिटवण्यासाठी एसटी व्यवस्थापक व कर्मचारी संघटना यांच्यात बैठक सुरू असून एसटीचा संप मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषीत संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे जाणवत आहे. तुलनेने, मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरु होती. संपाला हिंसक वळण लागले असून राज्यात विविध ठिकाणी 19 शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली.

अपूऱ्या वेतनवाढीच्या निषेधात कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियात संपाची हाक देत महामंडळाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पासून सुरू असलेल्या अघोषीत संपामुळे व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. एसटी व्यवस्थापनाने कर्माचाऱ्यांवर निलबंनाची कार्यवाहीही सौम्य केली असून संपावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाची बैठक सुरू आहे.

Web Title: ST strike continue on the next day