एसटीचा कारभार मराठीत करणार - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई - एसटी महामंडळाच्या कारभाराचे पूर्णत: मराठीकरण करण्यासाठी आपला प्रयत्न असेल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात सोमवारी (ता.27) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

"सर्वसामान्य मराठी माणसाच्या मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी एसटी महामंडळाने वेळोवेळी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणूनच एसटीच्या कारभाराचे पूर्णत: मराठीकरण करण्यासाठी आग्रही असेन, असे परिवहन मंत्र्यांनी भाषणात सांगितले. या वेळी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल व अन्य अधिकारी उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिवाकर रावते यांनी भाषणादरम्यान, जे खासगी एसी बसने प्रवास करतात, त्यांच्यासाठी लवकरच एसी शिवशाही बस आणणार असल्याचे सांगितले. एसटीला लाल डबा म्हणून हिणवू नका. हा लाल डबा राज्यातील सर्वसामान्यांचा प्रमुख आधार आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: st work in marathi