वेतनवाढीसाठी एसटी कामगारांचे उपोषण 

वेतनवाढीसाठी एसटी कामगारांचे उपोषण 

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मूळ वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आज आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. राज्य शासनाने 1 जून 2018 रोजी चार हजार 849 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र त्यातील एक हजार 500 कोटी शिल्लक राहणार असल्याने, मूळ वेतनवाढ वाढवून देण्याची मागणी संघटनेने केली आहे. 

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी चार हजार 849 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. 2016 ते 2020 या कालावधीच्या वेतन करारासाठी ही वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देऊनही त्यातील एक हजार 500 कोटी शिल्लक राहत असल्याने सातव्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार वाढीव वेतनवाढ मिळावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. 

राज्य सरकार जोपर्यंत मूळ वेतनवाढ करत नाही तोपर्यंत 2016 ते 2020 या वेतन करारावर मान्यताप्राप्त संघटना सही करणार नाही. उपोषणाची शासनाने दखल न घेतल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभर उपोषण सुरू केले जाणार आहे. 
-संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. 

उपोषण स्वहितासाठी असल्याचा आरोप 
मान्यताप्राप्त असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या उपोषणाला, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेने विरोध दर्शविला आहे. उपोषण स्वहितासाठी असून संघटनेच्या अध्यक्षांसहित एसटीमधील एक लाख सात हजार कामगारांनी प्रशासनाने जाहीर केलेली वेतनवाढ स्वीकारली आहे. त्यामुळे या फसव्या आंदोलनाला कामगार बळी पडणार नाही, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com