बाईक रुग्णवाहिकेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - मुंबईतील रस्त्यांवरील ट्रॅफिकमधून रस्ता काढणे रुग्णवाहिकेलाही कठीण होत आहे. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुंबईत बाईक रुग्णवाहिका सेवेचा प्रारंभ मंगळवारी झाला. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून ही बाईक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून, त्याचा फायदा विशेषतः दक्षिण मुंबईत राहणाऱ्या रहिवाशांना होणार आहे. 

बाईकला जोडलेल्या स्ट्रेचरसह साडेपाच फूट बाय सहा फूट आकाराच्या या बाईक रुग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडर, हार्ट व रक्तदाबाच्या उपकरण व औषधांसह प्रथमोपचार, रक्तदाब तपासणी, शुगर चेकिंग मशीन, पल्स रेट चेक मशीन इ. आपत्कालीन सुविधा असणार आहेत. सोबत डॉक्‍टर आणि रुग्णासोबत एका नातेवाइकाला ॲम्ब्युलन्समध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या बाईक रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. ही बाईक ॲम्ब्युलन्स सेवा मोफत असून, १२७८ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.

Web Title: Start of bike ambulance