मुंबई : दिव्यांग प्रवाशांना मेल, एक्सप्रेसमधील सवलती तिकीट देणे सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : दिव्यांग प्रवाशांना मेल, एक्सप्रेसमधील सवलती तिकीट देणे सुरू करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्या या 'विशेष गाड्या' म्हणून धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांना विशेष तिकीट दर आकारला जात आहे. यासह सवलतीच्या दरातील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे सवलतीचे तिकीट दिले जात नाही. त्यामुळे मागील दीड वर्षापासून सुरू असलेली लूट थांबविण्यात यावी. सर्वत्र नियमात शिथिलता येत असल्याने कोरोनापूर्व काळाप्रमाणे गाड्या चालवून तिकीट दर आकारावे. दिव्यांग प्रवाशांना मेल, एक्स्प्रेसमधील सवलतीचे तिकीट, दिव्यांगाचा राखीव डबा देणे सुरू करण्याची मागणी विकलांग विकास सामाजिक संघाच्यावतीने केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊननंतर भारतीय रेल्वेवरील मेल, एक्स्प्रेसची सुविधा सुरू केली. मात्र, कोरोना विशेष गाड्या सुरू प्रवाशांना अधिकचे तिकीट भाडे देणे सुरू केले. परिणामी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांना मिळणारे सवलतीचे तिकीट देणे बंद केले. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना खिशातून जादा पैसे देऊन तिकीट काढावे लागत आहे. कोरोना काळात सर्वांचे आर्थिक धाबे दणाणले असताना, रेल्वे प्रशासनाकडून तिकिटाद्वारे लूट सुरूच आहे.

हेही वाचा: पालघर : काळ्या फिती लावून दिवाळी; शिक्षक भरतीसाठी आंदोलन सुरूच

ही लूट बंद करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना मेल, एक्स्प्रेसमधील सवलत बंद केली असून दिव्यांगांचा राखीव डबा प्रवासासाठी बंद केला आहे. या डब्यातून पोलिस, रेल्वे कर्मचारी प्रवास करताना दिसून येतात. संपूर्ण देशात मेल, एक्स्प्रेस चालू झाल्या असताना विशेष ट्रेनच्या नावाखाली चालू असलेल्या उत्सव विशेषमध्ये दिव्यांगांना सवलतीचे तिकीट मिळत नाही, असे संघाच्यावतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: UPSC नागरी सेवा मोफत कोचिंगसाठी यंदा आले कमी अर्ज! वेळापत्रकात बदल

दिव्यांगांचा डबा बंद केल्यामुळे दिव्यांग त्रस्त असून त्यांना प्रवास करण्यास अडचण येत आहे. आरक्षित तिकीट न मिळाल्यामुळे त्यांना कामानिमित्त प्रवास करता येत नाही. पूर्वी आरक्षित डबा वेगळा असल्यामुळे दिव्यांग विना आरक्षण या डब्यातून प्रवास करू शकत होते; परंतु लॉकडाऊनपासून दिव्यांगांना प्रवास करण्याची सुविधा बंद केली आहे. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. जादा पैसे मोजून मेल, एक्स्प्रेसची तिकिटे खरेदी करावी लागत आहेत, असे विकलांग विकास सामाजिक संघाच्यावतीचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी सांगितले. यासंदर्भात गायकवाड यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, रेल्वे राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

loading image
go to top