तुर्भे मधील हनुमान नगर आणि आंबेडकर नगर येथे बालवाडी सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

खारघर - रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज आणि  आदर्श सेवा भावी संस्था यांच्या सयुंक्त विध्यमाने तुर्भे मधील हनुमान नगर आणि आंबेडकर नगर  झोपडपट्टीत नुकतीच बालवाडी सुरु करण्यात आले. 

या वेळी क्लबचे अध्यक्ष प्रकाश मांझी, सुनीता मांझी,पी के आदक,एस सूर्यनारायण,आर राजाराम,प्रदीप सिन्हराय ,मिता राजाराम, हेमा सूर्यनारायण, मनोज नायक, व्ही.व्ही राघवराजू, मुकुंद जोशी, जस्मिन ठक्कर, आदर्श सेवा भावी संस्थेचे पदाधिकारी अनुसया शिवाजी जाधव, गजानन चव्हाण, गौतम सूर्यवंशी, बालवाडी शिक्षका रसिका मढवी, वर्षा काटकर आदि मान्यवर उपस्थित होते

झोपडपट्टीतील कोणतेही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये,मुलांना शिक्षणांची आवड निर्माण व्हावी हे ध्येय समोर ठेवून रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराईज आणि आदर्श सेवा भावी संस्था यांच्या सयुंक्त विध्यमाने बालवाडी सुरु करण्यात आली आहे.या वेळी बालवाडीतील मुलांना उजळणी, दप्तर, पाट्या, खडू ,बडबड गीते आदि साहित्य वितरण करण्यात आले. शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणातूनच सुसंस्कृत, सृजनशील व चारित्र्यसंपन्न पिढी घडविता येते. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण द्या असा सल्ला मिता राजाराम यांनी उपस्थित पालकांना दिला.  गजानन चव्हाण -सोबत बालवाडी तील मुलाना खाऊ वाटप करतानाचे  फोटो जोडले आहे

Web Title: Start the kindergarten in Hanuman Nagar and Ambedkar Nagar in Turbhe