राज्यातील सार्वजनिक वाहतुक सुरु करा अन्यथा थाळीनाद आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा

प्रशांत कांबळे
Tuesday, 11 August 2020

एसटी, बेस्ट या सार्वजनिक वाहतूक सेवा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब सुरू कराव्यात, अन्यथा वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने 12 ऑगष्ट रोजी राज्यातील एसटी बस डेपोच्या पुढेच थाळीनांद आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

मुंबई ः एसटी, बेस्ट या सार्वजनिक वाहतूक सेवा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब सुरू कराव्यात, अन्यथा वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने 12 ऑगष्ट रोजी राज्यातील एसटी बस डेपोच्या पुढेच थाळीनांद आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

...तर खासगी डॉक्टरांवर कारवाई, केडीएमसी आयुक्तांचा इशारा

राज्य सरकारने गेल्या 25 मे पासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 
सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. यामध्ये ऑफिस, दुकाने, हाॅटेल, मार्केट आणि आपापसातील संपर्क कमी होईल असे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतर या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केला असून, कोरोना
 विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के, तर15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहे. तर 5 टक्के लोक अस्थिर असल्याचा  तज्ज्ञांनी  निष्कर्ष काढले आहे. 

पावसाचा कोटा पुर्ण; मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला परंतु, पावसाचा जोर पु्न्हा वाढण्याची शक्यता

राज्य सरकारने या एकूण 20 टक्के लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्नांकडे लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी 100 टक्के लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परीणाम समोर आले आहे. त्यातच गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतुकीचे आरक्षण सुरूवात झाले आहे. खासगी सेवा चालु होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे. सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेच. परंतु त्या फारच अपुऱ्या आहे. सरकारने या सेवा निदान 50 टक्के तरी चालु कराव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडी 12 ऑगष्ट रोजी संपुर्ण महाराष्ट्रात भर एसटी बस डेपोच्या समोर थाळी नांद आंदोलन करण्याचा इशारा अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिला आहे.

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start public transport in the state; Deprived Bahujan Front warns government