शिवसेना खासदार शुभारंभ करत असताना अचानक मनसे आमदारांची एंट्री

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ होत असतानाच मनसे आमदार राजू पाटील हे तेथे आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ होत असतानाच मनसे आमदार राजू पाटील हे तेथे आले. sakal

डोंबिवली : कल्याण शीळमार्गावरील महत्वाचा देसाई खाडीवर नविन पूल उभारण्यात येत आहे. या पुलावर सिमेंटचे गर्डर टाकण्याचे काम शनिवारी रात्री हाती घेण्यात आले. गर्डर लॉंचिंग सोहळ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (shrikant sinde) यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ होत असतानाच मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) हे तेथे आले.

विकास कामांवरून एकमेकांना आव्हान देणारे आमदार खासदार आमने सामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. खासदार शिंदे यांनी विरोधकांनी नुसते व्हिडीओ बनवत रहा असे आव्हान नुकतेच एका कार्यक्रमात दिले होते. आणि त्यानंतर शनिवारी आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी उपस्थिती लावल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे शिवसेना आणि मनसे यांची जोरदार टक्कर पहायला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नविन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलावर सिमेंटचे गर्डर ठेवण्याचे काम शनिवारी रात्री हाती घेण्यात आले. पुलाच्या गर्डर लॉंचिंग कामाचा रात्री 11 वाजता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राजेश कदम, राजेश मोरे, प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, सागर जेधे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. याच दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी अचानक कार्यक्रमात एंट्री घेतली. त्यांच्या येण्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आमदार कसे आले याविषयी एकच कुजबुज सुरू झाली.

शहरातील विकास कामांवरून एकमेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टोला लगावणारे खासदार शिंदे आणि आमदार राजू पाटील हे या कार्यक्रमात आमने सामने आल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. डोंबिवलीत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी खासदार डॉ. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि मनसे या विरोधकांना व्हिडीओ व मिम्स बनवत राहण्याचे आव्हान दिले होते. तसेच लवकरच एका कामाचा शुभारंभ होणार आहे त्याचेही मिम्स बनवा असा खोचक टोमणा ही मारला होता. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मनसे आमदार पाटील यांनी एन्ट्री घेतल्याने ते ही ते एकटेच तेथे आल्याने आमदारांना काय सूचित करायचे आहे याबद्दल कार्यकर्ते आपापसात कुजबुजत होते. शिवसेनेच्या कार्यक्रमात मनसे आमदार आल्याने काही शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले होते, तर काही शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.पुलावर पहिला गर्डर टाकेपर्यंत खासदार आमदार त्याठिकाणी उपस्थित राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com