द्वारली गावात हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू

Hatti-ro
Hatti-ro

कल्याण : कल्याण शहरालगत असलेल्या द्वारली गावातील सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्तीरोगाची लागण होऊ शकते, असा वैद्यकीय अहवाल आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 3 डिसेंबर पासून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी हत्तीरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली जात आहे. यात द्वारली येथील जिल्हा परिषद शाळेमधील सहा मुलांच्या रक्तात हत्ती रोगाचे विषाणू आढळून आले आहे. यामुळे या परिसरातील साफसफाई फवारणी बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ तसेच शहापूर तालुक्यातील गावांमधील विद्यार्थ्यांची रक्त तपासणी होणार आहे. कल्याणलगतच्या द्वारली येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केली असता सहा ते आठ वयोगटातील सहा मुलांना भविष्यात हत्ती रोगाची लागण होऊ शकते, असा अहवाल मिळाला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांना बारा दिवसांसाठी औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या घरा भोवतालची साफसफाई तसेच फवारणी यावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डीइसी गोळी नियमितपणे देण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी हत्ती रोगाची लागण होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळेच सरकारच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण परिसरात नियमितपणे ही मोहीम राबवली जाते. ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान या मोहिमेअंतर्गत गावातील नागरिकांवर औषधोपचार केले जातात. मागील दोन वर्षांपासून लहान मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करत केंद्र तसेच राज्य सरकार मार्फत हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे.

''द्वारली गावातील  जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिलीत शिकणारे सनी राजभर, रिया यादव, राशी इटनकर, तसेच सोहेल शेख तर दुसरीतील अलिशान शेख, काजल यादव ही सहा मुलं हत्तीरोग या आजाराने बाधित होण्याची शक्यता आहे.''
- मनीष रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे

''क्युलेक्स या जातीच्या डासांमुळे हा आजार होतो. संध्याकाळी पाच-सहा नंतर या आजाराचे विषाणू शरीरात कार्यरत होत असल्याने दररोज संध्याकाळी या विद्यार्थ्यांना औषध उपचार दिले जात आहेत. या रोगाची लक्षणे आढळून येण्यास काही वर्षांचा कालावधीही लागू शकतो मात्र विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या रक्त तपासणी दरम्यान याची लक्षणे दिसली आहेत.''
- डॉ राजू लवंगारे, आरोग्य अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका

''27 गावे जरी महापालिका क्षेत्रात असली तरी तेथील शाळा आजही जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. त्या ठिकाणी  होणारी आरोग्य तपासणी जिल्हा परिषदे मार्फत केली जाते त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जातो कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही मात्र तरीही या ठिकाणी उचित कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.''
- रोहिदास चव्हाण, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, द्वारली

शाळेतील सहा मुलांना हत्ती रोग होण्याची शक्‍यता असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाकडून या मुलांना पुढील बारा दिवसांसाठी औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी या घरांना भेट देऊन संध्याकाळच्या वेळात त्यांना औषधे देत आहेत. यातील पाच विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील तर एक विद्यार्थी चंद्रपूर मधील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com