..आणि चक्क मुख्य सचिवांनी हातात घेतला चहाचा ट्रे.. स्वतःच्या हातानं सहकाऱ्यांना दिला चहा... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहेत. त्यातच मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात आहेत. राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान मुख्य सचिवांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.

मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहेत. त्यातच मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात आहेत. राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान मुख्य सचिवांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.

कोविड-19 चा प्रादुर्भाव, उपचार आणि गरजूंना मदत याबाबत आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. यात बैठकीत एक अनोखं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. बैठकी दरम्यान होणाऱ्या चहापाण्याच्या कार्यक्रमावेळी चक्क राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आपल्या सहकाऱ्यांना चहा दिला आहे. 

हेही वाचा: ऑनलाईन परवानगी मिळाली नाही; मग त्यानं धरली व्हीलचेअरवरून घरची वाट... 

 मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी कपमध्ये आपल्या सहकाऱ्यांसाठी चह ओतत आहेत असं फोटोत बघायला मिळत आहे. चहाचा ट्रे अजोय मेहता आपल्या सहकाऱ्यांसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. अजोय मेहता यांनी स्वतः तो चहाचा कप आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसाठी घेऊन गेले आणि मुंबई पोलिस आयुक्तांनी तो सर्वांना सर्व्ह केला. 

मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत आले: 

याआधी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आपली गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले होते. तसंच महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनासाठी मंत्रालयात येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आले होते. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर कोरोनापासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता. सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली होती.

हेही वाचा: मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल 'इतक्यानं' झाली कमी.. महापालिकेची नवी आयडिया.. 

या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण स्वावलंबी बनत आहे. मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्यामुळे नागरिकांना प्रेरणा मिळत आहे. 

state general secratery ajoy mehta served tea to all in meeting read full story  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state general secratery ajoy mehta served tea to all in meeting read full story