राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत : भाजप आमदार संजय केळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत : भाजप आमदार संजय केळकर

ठाणे : केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल - डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे,अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Petrol-Diesel Price : कर कमी करण्यासाठी नागपुरात आंदोलन

मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नसल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

loading image
go to top