सफाळे - पालघर राज्यमहामार्ग क्र.4 पाण्याखाली 

प्रमोद पाटील
सोमवार, 9 जुलै 2018

सफाळे : पालघरमधील माकूणसार खाडीपात्रात पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहात बांध घालून त्याचा मुख्य प्रवाह बदलण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून सफाळे- पालघर राज्यमहामार्ग क्र.4 पाण्याखाली जाऊन सोमवारी (ता.9) या मार्गावरील वाहतूक पहाटे पासून बंद झाली . त्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची गैरसोय झाली. 

पालघर-सफाळे हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून सफाळे भागातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये जा करतात. आज सोमवार असल्याने या मार्गावर सकाळ पासून वाहने या मार्गावर माकुणसार येथे पाणी आल्याने रस्ता बंद झाला. सर्व वाहने यारस्त्यावर बंद झाल्याने शाळकरी मुलांसह इतरांना मागे वळून जावे लागले. या रस्त्यावरील हा धोका लक्षात घेऊन  ग्रामस्थ माकूणसार आणि ग्रामपंचायत माकूणसार यांनी फेब्रुवारी महिन्यापासून तहसीलदार पालघर आणि उपविभागीय अधिकारी पालघर यांच्या कडे पत्रव्यवहार केला आहे परंतु संबंधीत महसूल विभागाने दुर्लक्ष केले आहे तसेच येथील मोठ मोठे बांध टाकणारयांना सुद्धा सुचना देण्यात आली आहे असे सरपंच जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, येथील नैसर्गिक नाळयाचा मार्ग मोकळा करावा या  बाबतीत येथील ग्रामस्थ नागेश वर्तक, भुपेश म्हात्रे यांनी उपविभागीय अधिकारी डाॅ विकास गजरे यांची शनिवारी (ता. 7) भेट घेऊन या बाबतीत गांभीर्याने लक्ष दयावे अशी मागणी केली आहे. 

 या नैसर्गिक नाळयाचा मुळ प्रवाह बदलल्याने पावसाळ्यात नेहमीच हा मार्ग बंद राहील अशी भिती व्यक्त करून या नैसर्गिक नाळयाचा मुळ मार्ग मोकळा करावा अशी मागणी येथील लोकांनी केली आहे. 

Web Title: state high way safale palghar close due to rain and water on road