राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व अधिकारी पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

बोर्डी - २०१८-१९ या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व अधिकारी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये जागृती अवनीश पाटील यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व अधिवेशनात हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने राज्य पुरस्काराची निवड करण्यात आली असून, ३ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राज्यभर सोशल मिडियाच्या माध्यमातून लिंक भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने अतिशय पारदर्शक निवड करण्याची ही पहिलीच वेळ असून, राज्यभरातून जवळपास चार हजार पाचशे हून अधिक अर्ज निवड समितीला प्राप्त झाले होते. यातून छाननी करून शिक्षण क्षेत्रात व इतर क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्य़ातून एका कॅटेगरीतून एक अशी पुरस्कार निवड करण्यात आली असल्याचे राज्य निवड समितीने सांगितले आहे. 

Web Title: State-level Model Teachers and Officers Award