थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र नेहमीच इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या उद्योगसुलभ धोरणात्मक निर्णयांमुळे परदेशांनी महाराष्ट्रालाच पसंती दिली आहे.

मुंबई - परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र नेहमीच इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या उद्योगसुलभ धोरणात्मक निर्णयांमुळे परदेशांनी महाराष्ट्रालाच पसंती दिली आहे.

केंद्राच्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याच्या (डीआयपीपी) सहामाही अहवालातून प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून हे उघड झाले आहे.
केंद्र सरकारच्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याच्या संकेतस्थळावर सहा महिन्यांत विविध राज्यांत झालेल्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. सेवा, गृहनिर्माण, टाऊनशिप्स, पायाभूत सुविधा, संगणक-हार्डवेअर व सॉफ्टवेअर, दूरसंचार- टेलिफोन, मोबाईल नेटवर्क, वाहन उद्योग, औषधे या क्षेत्रांतील गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2016 या सहा महिन्यांत राज्यात 68 कोटी 409 लाखांची गुंतवणूक झाली आहे. या कालावधीत देशात एकूण एक लाख 44 हजार 674 कोटींची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक करण्यात मॉरिशस, सिंगापूर, इंग्लंड, जपान, अमेरिका व नेदरलॅंड हे देश आघाडीवर आहेत.

राज्य सरकारने दोन वर्षांत राबवलेल्या उद्योगसुलभता धोरणामुळे दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रोत्साहन व कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

महत्त्वाची परकीय गुंतवणूक (कोटी रु.)
राज्य 2015-16 एप्रिल-सप्टेंबर 16

महाराष्ट्र 62731 68409
दिल्ली 83288 23415
तमिळनाडू 21781 4136
कर्नाटक 26791 7216
आंध्र प्रदेश 10315 7204
गुजरात 14667 2462

Web Title: State the number of foreign direct investment