'एसटी'ने जाण्याच्या विचार करत असाल तर जरा थांबा! ही बातमी वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 22 मार्च 2020

  • राज्यातील एसटीची सेवा बंद 
  • खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकीला सुद्धा बंदचे आदेश 
     

मुंबई :  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने एसटी महामंडळाची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. रविवारी मध्यरात्री 12 वाजता नंतर एसटी आणि ट्रॅव्हल्सची सेवा 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, फक्त अत्यावश्‍यक सेवेसाठी राज्यात एसटी गाड्या धावणार असून, सामान्य प्रवाशांना त्यामधून प्रवास करता येणार नसल्याचे परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. 

थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास

कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मध्ये रेल्वे, उपनगरीय लोकल सेवा, खासगी ट्रॅव्हल्स, मोनो, मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असतांना, त्यासोबतच नागरिकांची गर्दी होणाऱ्या एसटी सेवेच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी एसटी महामंडळाची प्रवासी सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामूळे एसटीच्या सुमारे 18 हजार 500 बसेस असेल त्या आगारात उभ्या करण्यात आल्या असून, एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी देण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहे. 

धक्कादायक! रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

अत्यावश्‍यक सेवेसाठी बेस्ट, एसटीवर भार 
मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर, या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे या प्रमूख रेल्वे स्थानकांपर्यंत सोडण्यासाठी बेस्ट आणि बसेसद्वारे प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. मात्र, यामध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार नसून, अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state transport service suspended for 31 march