कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे 'राज्यवापी' काम बंद आंदोलन

electricity worker
electricity worker

कल्याण : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या रोजगार आणि अन्य प्रश्नांबाबतची चर्चा निष्फळ ठरल्याने कामगार संघटनांनी आजपासून (ता. 7) राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महावितरणचे अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर यावर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कामगारांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. 

महावितरण कंपनीच्या वतीने मागील अनेक आंदोलनामध्ये ज्या चर्चा झाल्या त्याची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. आता सात हजार पदांची भरती झाल्यानंतर मागील 10 ते 15 वर्ष कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना आम्ही कामावर ठेवू शकणार नाही, असे सांगत यावर प्रशासन ठाम राहिले असे कामगारांचे म्हणणे आहे. तर सात हजार कंत्राटी कामगारांच्या जॉब सिक्युरिटीबाबत तसेच त्यांना सामावून घेण्याबाबत सरकार धोरणात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासनानाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने ही चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती कामगार संघटनेच्या कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली.

Statewide work stoppage agitation of contract power workers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com