निरोगी राहा, आनंदी राहा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व येरळा मेडिकल कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. सीमा मेहेरे यांनी केले.

नवी मुंबई : महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व येरळा मेडिकल कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. सीमा मेहेरे यांनी केले. ‘सकाळ’तर्फे रविवारी (ता.6) तुर्भे पोलिस वसाहतीत महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.    
 
स्त्री म्हणून जगत असताना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक आजारपण उद्भवण्याची शक्‍यता असते. आजारापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घेणे आवश्‍यक आहे, याची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली. वयोमानानुसार आहार कसा असावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या दिवसांत घ्यावयाची काळजी यासंदर्भात सविस्तर माहिती त्यांनी दिली. सोबतच निरोगी राहण्यासाठी योगा व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. स्त्रियांनी वयोमानानुसार आवश्‍यक असणाऱ्या तपासण्या नियमित करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी महिलांशी मनमोकळा संवादही साधला. महिलांच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान केले. तुर्भे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारीवर्गाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे ज्ञानात मोठी भर पडली. सोप्या पद्धतीने आरोग्यविषयक माहिती दिल्याने प्रबोधन झाले.
- सुप्रिया चव्हाण, रहिवासी, तुर्भे पोलिस वसाहत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay healthy, be happy