वाफेवरचे इंजिन धावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

101 वर्षांपूर्वीच्या इंजिनाची अधिकाऱ्यांसाठी विशेष फेरी
नेरळ - पर्यटकांच्या सेवेसाठी 114 वर्षांपासून धावणारी नेरळ- माथेरान- नेरळ ही मिनी ट्रेन ऐतिहासिक वारसा म्हणून आजही सेवेत आहे.

101 वर्षांपूर्वीच्या इंजिनाची अधिकाऱ्यांसाठी विशेष फेरी
नेरळ - पर्यटकांच्या सेवेसाठी 114 वर्षांपासून धावणारी नेरळ- माथेरान- नेरळ ही मिनी ट्रेन ऐतिहासिक वारसा म्हणून आजही सेवेत आहे.

बुधवारी जागतिक वारसा दिनानिमित्त 101 वर्षे वयोमान असणाऱ्या इंजिनाची विशेष फेरी निघाली. मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह अन्य रेल्वे अधिकाऱ्यांसाठी ही विशेष फेरी चालवण्यात आली. या अधिकाऱ्यांनीही सफरीचा आनंद लुटला. अमन लॉज ते माथेरान दरम्यान वाफेच्या इंजिनासह धावणारी ही मिनी ट्रेन पाहून पर्यटकही भारावले.

1917 मध्ये नेरळ- माथेरान- नेरळ ही मिनी ट्रेन पहिल्यांदा धावली. त्याला जोडलेले "एनडीएम 794 बी' हे इंजिन आजही मध्य रेल्वेच्या ताफ्यात आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनानुसार वाफेच्या इंजिनाची विशेष फेरी सुरू करण्यात आली. या वेळी मध्य रेल्वेचे इतरही अधिकारी उपस्थित होते. या वेळी इंजिनाला दोन प्रवासी डबे जोडले होते.

वाफेचे इंजिन असलेल्या माथेरान मार्गावरील फेरीसाठी रेल्वेच्या सुरक्षा विभागाची अंतिम परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळाल्यानंतर वाफेच्या इंजिनासह धावणारी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी दाखल होईल.
- ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: steam railway engine