राष्ट्रवादीचे पाच आमदार अजूनही नॉटरिचेबल!

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना दिवसभरात एकत्र करण्याचे काम सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेसोबत दुपारी बैठक घेतली. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सायंकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

Image may contain: 12 people, including Suhas Gavali, Rupesh Deshmukh and Sanjay Khairnar, indoor

अजित पवारांच्या हकालपट्टीवर एकमत
या बैठकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेते पदावरून अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यांच्या जागी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सूत्रे देण्यात आली आहेत. नवा विधीमंडळ नेता घोषित करेपर्यंत जयंत पाटील यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. राज्यात भाजपने जे चोरी चोरी चुपके चुपके सरकार स्थापन केलंय ते टिकणार नाही. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे महाविकासआघाडीचेच सरकार सत्तेवर येईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार मुंबईतच राहणार आहेत.'

Image may contain: Deepak Shinde, sitting and indoor

आणखी वाचा : अजित पवार यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी 

आणखी वाचा : अजित पवार यांच्या बंडखोरीचा 'सातबारा'

'सरकार टिकाणार नाही'
वाब मलिक म्हणाले, 'आज दिवसभरात राष्ट्रवादीचे पाच आमदार पक्षापासून नॉटरिचेबल आहेत. अद्याप सहा जण वाटेवर असून, ते संपर्कात आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला असला तरी, हे सरकार सभागृहात टिकणार नाही. आम्ही तिन्ही पक्षांचे आमदार मिळून, सभागृहात विधिमंडळ अध्यक्ष निवडीतच आम्ही सरकारला धक्का देऊ.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: still five mlas are not reachable party spokesperson nawab malik press conference