मुंबईत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफच्या 8640 बाटल्या जप्त

याप्रकरणी NCB मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे, पुढील तपास सुरु आहे.
crime
crimeesakal
Summary

याप्रकरणी NCB मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे, पुढील तपास सुरु आहे.

मुंबई - मुंबईतील भिवंडी परिसरात आज एनसीबीकडून एक धडक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई युनिटने भिवंड परिसरातून ८, ६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफचा साठा जप्त केला आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे भिवंडी परिसरात गोंधळ पसरला आहे. अचानक इतका मोठा साठा इथे कसा मिळाला असा सवालही यामुळे उपस्थित होतं आहे. यासंदर्भातील अधिकचा तपास एनसीबीने सुरु केला आहे.

crime
'संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर..' CM ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील भिवंडी परिसरात एनसीबीच्या मुंबई युनिटने ८, ६४० नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरफचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी NCB मुंबई युनिटने दोघांना अटक केली आहे. भिवंडीच्या आग्रा-मुंबई महामार्गावर हा साठा एका गाडीतून येणार असल्याची माहिती एनसीबीला आधी मिळाली होती. त्यानुसार एका संशयित बोलेरो पिकअपची NCB अधिकारऱ्यांनी झडती घेतली.

या संशयित वाहनातील ६० बॉक्समध्ये एकूण ८६४ किलो (८६४० बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप भरलेले आढळले आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत ३५ लाख रुपये आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एनसीबी अधिकरी या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरु आहे. इतक्या मोठ्या कारवाईमुळे मात्र भिवंडीकर गोंधळलेल्या स्थितीत आहेत.

crime
महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाची उसंत, हवामान कोरडे राहणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com