प्रतिबंधित औषधांचा साठा विमातळावरून जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिबंधित औषधांच्या 238 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. ही औषधे ते सौदी अरेबियात नेणार होते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मोहम्मद मोसीन व मेहेंदी हसन, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील राजेश नावाच्या व्यक्तीने प्रतिबंधात्मक औषधे त्यांच्याकडे दिली होती, असे चौकशीत सांगितले. रियाध परिसरात जाऊन आरोपींना या औषधांच्या बाटल्या एका हस्तकाला देण्यासाठी सांगण्यात आले होते. या कामाचे त्यांना 20 हजार रुपये मिळणार होते. आरोपींकडून "कफ लिंटस फेन्सेडाइल' या प्रतिबंधात्मक औषधांच्या 238 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: stocks of restricted medicines seized Crime