लोकलमध्ये चोऱ्या करणारी महिला डोंबिवलीत अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - पतीची नोकरी गेल्यानंतर कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी लोकलमध्ये वृद्ध महिलांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. त्रिशला भालेराव असे तिचे नाव आहे. तिच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात तीन महिन्यांपासून चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. तपासाकरता दोन पथक तयार करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (ता. २७) त्रिशलाला अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.

मुंबई - पतीची नोकरी गेल्यानंतर कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी लोकलमध्ये वृद्ध महिलांना लक्ष्य करून चोऱ्या करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. त्रिशला भालेराव असे तिचे नाव आहे. तिच्याकडून साडेतीन लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात तीन महिन्यांपासून चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. तपासाकरता दोन पथक तयार करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (ता. २७) त्रिशलाला अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या अटकेमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली असून, साडेतीन लाखंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पतीची नोकरी गेल्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तिने म्हटले.

Web Title: stolen woman arrested Dombivli police