पोटाच्या विकारांत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

बेलापूर - नवी मुंबईतील रुग्णालयांच्या सर्वेक्षणानुसार उन्हाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंगावणाऱ्या माश्‍या यातून बरेचदा जीवाणूंना शरीरात प्रवेश करायला संधी मिळते. त्यामुळे जुलाब व अतिसाराचा त्रास होतो. १५ दिवसांत अशा प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती वाशीतील स्टर्लिंग वोक्‍हार्ट रुग्णालयाचे केंद्रप्रमुख डॉ. मेहुल कालावाडिया यांनी दिली. 

रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या आजारांना बाहेरील खाद्यपदार्थ कारणीभूत ठरत असल्याचे आढळले आहे. सध्या तापमानवाढीमुळे सतत घाम येतो. त्यातच खाद्यपदार्थ तयार होत असलेल्या भट्टीशेजारी काम करणाऱ्या आचाऱ्यांची स्थिती अधिक वाईट असते. त्यांना येणाऱ्या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्हज) घालणे फार महत्त्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून संसर्ग कमी होतो; परंतु सॅण्डविच, भेळपुरी, शेवपुरी, चायनीज, फ्रॅंकीज अशा पदार्थांसाठी कांदे, टोमॅटो, कोथिंबीर खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्‍यता असल्याने त्यातून ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस, ऑरिअस अशा हगवण व अतिसाराला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा संसर्ग होतो. रस्त्यावरील लिंबूपाणी, ताक, फळांचा रस आणि शीतपेय हेही पोटाच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत. 

मूत्राशयाचे विकार
मार्च ते जूनच्या अखेरपर्यंत मुतखड्याच्या पेशंटमध्ये ३० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ होते. किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्यावर वैद्यकीय उपचार करणे फार गरजेचे असते. अनेक वेळा नागरिक याकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे किडनीसंबंधित विकार बळावण्याची शक्‍यता निर्माण होते. मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते. त्यामुळे असे महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते व कोरडेपणा वाढतो. त्यामुळे शरीरातून घाम येण्याचे प्रमाण वाढते व शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. पाण्याचा समतोल ठेवण्याची जबाबदारी किडनीवर असल्याने त्याचा विपरित परिणाम किडनीवर होत असतो.
- डॉ. जितेंद्र खांडगे, किडनी विकारतज्ज्ञ, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरूळ

Web Title: stomach disorders due to eating outside food