पोटदुखीमुळे बालिकेच्या पोटाला चटके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

भोंदूबाबाचा प्रताप; टिळक रुग्णालयात काढला साडेतीन किलोचा ट्युमर
मुंबई - आजारांवर, दुखण्यावर औषधोपचारांऐवजी चटक्‍यांचा उपचार आजही देशभरात सुरू असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. शीव येथील टिळक रुग्णालयात मूत्रपिंडातून साडेतीन किलोचा गोळा काढलेल्या वैष्णवी सातवे या पाच वर्षांच्या मुलीला पोट दुखत असल्याने चटके देण्यात आले होते, असे रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. पारस कोठारी यांनी सांगितले.

मोठे पोट, भरपूर खाणे आणि पोटदुखी या त्रासापासून वाचवण्यासाठी आजीने (आईची आई) तिला पालघरमधील जंगलात एका भोंदूबाबाकडे नेले. त्याने वैष्णवीच्या पोटावर चटके दिले. तरीही पोटदुखी बंद होत नसल्याने त्याने तिला डॉक्‍टरकडे नेण्यास सांगितले, असे वैष्णवीच्या आजी आनंदी सातवे (बाबांची आई) यांनी सांगितले. डॉ. कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीवर उपचार सुरू करण्यापूर्वी तिच्या पोटावर चटके दिल्याचे डाग दिसले. तिचे वडील मनोरुग्ण होते. ते घर सोडून गेले. त्यानंतर तिची आईही मुलीला सोडून परागंदा झाली. तीन महिन्यांपासून मुलगी पोटदुखीने त्रस्त झाली होती. भोंदूबाबाने चटके दिल्यानंतर तिला पालघरमधील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी तिला मुंबईला नेण्याचा सल्ला दिल्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात घेऊन आल्याचे आनंदी सातवे यांनी सांगितले. डॉ. कोठारी यांना तपासण्या केल्या असता तिच्या पोटात मोठा ट्युमर असल्याचे समजले. टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यात आला.

दीडशेहून अधिक टाके
अवघ्या 10 किलो वजन असलेल्या या मुलीच्या उजव्या मूत्रपिंडातून डॉक्‍टरांनी साडेतीन किलो वजनाचा गोळा काढला. त्यासाठी तिचे पोट आडवे फाडावे लागले. आत व बाहेर दीडशेहून अधिक टाके हाताने घातल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मुलगी लहान असल्याने तिला स्टेपलर टाक्‍यांनी त्रास झाला असता, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. तब्बल सहा तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. दीड लिटर रक्त वाया गेल्याने मुलीला तीन बाटल्या रक्त आणि एक बाटली पांढऱ्या पेशी चढवण्यात आल्या.

Web Title: stomach pain girl's belly clicks