खोपोलीत लोकलवर दगडफेक करणारी टोळी सक्रिय 

दगडफेक झाल्यावर थांबविण्यात आलेली लोकल.
दगडफेक झाल्यावर थांबविण्यात आलेली लोकल.

खोपोली : खोपोलीत लोकलवर दगडफेकीच्या प्रमाणात वाढ झाली असून माथेफिरूंची तीन-चार जणांची टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता आहे. हे माथेफिरू लोकलवर दगडफेक करून फरारी होत असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. 

खोपोली रेल्वेस्थानकातून निघालेल्या चालत्या कर्जत लोकलवर अज्ञात माथेफिरूने रहाटवडे पाताळगंगा ब्रिजजवळ रविवारी दुपारी दगड मारला. दगडफेक होत असल्याने मोटरमनने लोकल थांबिवली. त्यानंतर खोपोली पोलिस, बिट मार्शल यांच्यासमवेत रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सुदैवाने प्रवाशांना दुखापत झाली नाही. 
रहाटवडे येथे पाताळगंगा नदीवरील पुलाच्या जवळपास चालत्या लोकलवर वारंवार दगडफेकीचे प्रमाण वाढले आहे.

मोटारमन ए. एन. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवड्यातून दोन ते तीन वेळा येथे दगडफेक झाली आहे. याबाबत रेल्वे पोलिस व खोपोली पोलिसांना कळविण्यात आले आहे. रविवारी लोकल सुटल्यावर याच ठिकाणी लोकलवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर तत्काळ लोकल थांबवून या घटनेची माहिती रेल्वे पोलिस व खोपोली पोलिस बिट मार्शल यांना दिली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दगडफेक करणारा तरुण व त्याचे तीन साथीदार झाडाझुडपांचा आसरा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेची रेल्वे पोलिस व खोपोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, लोकलच्या वेळेत दगडफेक करणाऱ्या माथेफिरूंवर पोलिसांची करडी नजर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com