मागेल त्याला रिक्षा, टॅक्सी परवाने योजना बंद करा - प्रकाश पेणकर

रविंद्र खरात 
शनिवार, 17 मार्च 2018

कल्याण : कुठलाही निकष न लावता शासनाने मागेल त्याला ऑटो रिक्षा परवाना सुरू केली मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

कल्याण : कुठलाही निकष न लावता शासनाने मागेल त्याला ऑटो रिक्षा परवाना सुरू केली मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

कोकण विभागातील ठाणे जिल्हा आणि एमएमआरटीओ क्षेत्रात सुमारे एक लाख रिक्षा टॅक्सी प्रवासी सेवा करीत असून तीन ते चार लाख कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत आहे. राज्य शासनाने मागेल त्याला ऑटो आणि टॅक्सी परवाना खुले केल्यामुळे अनेक खासगी कंपनी  बेकायदेशीर प्रवासी वाहने इतर पर्यायी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आणि खुले केलेले ऑटो रिक्षा टॅक्सी यांची संख्या यांचा विचार करता सर्व शहरात प्रवासी घेण्यासाठी जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. 

सन 1997 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा परवाने बंद होते. 2014 ते 2016 या कालावधीत गरजेनुसार परवाने वाटप करण्यात आले. यामुळे मुंबई, एमएमआरटीओ आणि मुंबई उपनगरात टॅक्सी आणि रिक्षाची संख्या समतोल होती.

मात्र कल्याण डोंबिवली शहरासहीत अन्य शहरातील रस्ते, लोकसंख्या, अन्य वाहने, महानगरपालिका, रिक्षा संघटना, आदींचे मत न घेता मागेल त्याला रिक्षा टॅक्सी परवाने खुले केल्याने ज्या व्यक्तीला शहराची माहिती नसलेल्या टॅक्सी आणि रिक्षा परवाने घेत असल्याने शहरात टॅक्सी आणि रिक्षाची संख्या झपाट्याने वाढ झाली आहे. यावर नियम लावणे काळाची गरज आहे. 

अनेक शहरात वाहतूक कोंडी, प्रवासी घेण्यावरून होणारे वाद आणि शहरात होणारी वाहतूक कोंडी यामुळे व्यवसायात परिणाम होत असल्याने कर्ज बाजारी रिक्षा आणि टॅक्सी चालक त्रस्त झाला असून प्रत्येक शहराला आवश्यक असलेली गरज पाहता परवाने बाबत नियंत्रण आणावे त्यासोबत आगामी 10 वर्ष खुले परवाने प्रकिया वर स्थगिती आणावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. यामुळे रावते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

राज्यातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी संघटना शिवसेना आणि शिवसेना प्रणित असून राज्यातील परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पदभार घेताच रखडलेली काम पूर्ण करत सर्व सामन्याच्या हाताला काम मिळावे यासाठी परवाने खुले केले यात या मागणीसाठी शिवसेना प्रणित रिक्षा टॅक्सी संघटनाने जोर दिला असताना,  अचानक परवाने बंद करण्याच्या मागणी मुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला असून रावते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: stop the Rickshaw taxi licensing said by prakash penkar