कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद

मुरलीधर दळवी 
मंगळवार, 17 जुलै 2018

मुरबाड (ठाणे) - माळशेज घाटात छत्री पॉईंट जवळ पुन्हा दरड कोसळल्याने सोमवारी ता 16 रात्री पासून कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मंगळवारी सकाळ पासून दरडी काढण्याचे काम सुरु झाले असून, सायंकाळ पर्यंत वाहतूक सुरु होईल असे राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता एस व्ही पाटील यांनी सांगितले.    

माळशेज घाटात पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळतात त्यामुळे घाटातून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे सोमवारी सांयकाळी माळशेज घाटात सुरुवातीला रस्त्यावर झाड कोसळले नंतर दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर पडल्याने कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर टोकावडे पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे या मार्गाने पुणे जिल्ह्यातील ओतूर, आळेफाटा, जुन्नर तसेच नगर येथून कल्याण, वाशी, मुंबई कडे भाजीपाला, दूध व प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते सध्या या मार्गावरील वाहतूक कसारा व खंडाळा घाट मार्गे वळविण्यात आली आहे

Web Title: Stop the traffic on the Kalyan-Nagar National Highway