'म्हणींवरुन कथालेखन' स्पर्धेत मुंबईकरांची बाजी

Marathi
Marathi

मुंबई : लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘म्हणींवरून कथालेखन’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रौढकथा विभागात अंधेरीच्या शिल्पा शेडगे, तर बालकथा विभागात परळच्या स्नेहजीत वाघने प्रथम क्रमांक पटकावला. 

मराठीतील म्हणींना मोठी परंपरा असून या म्हणींचा वापर करुन स्पर्धकांना एक कथा लिहायची होती. राज्यभरातून या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसोबतच सर्वच वयोगटातील लेखकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून प्रौढकथा आणि बालकथा अशा दोन विभागांतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दोन्ही गटांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या पहिल्या पाच व 2 उत्तेजनार्थ अशा एकूण 7 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याबरोबरच अन्य विशेष प्राविण्य मिळविलेल्या प्रत्येकी 50 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.  

नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा स्पर्धेचा मुख्य हेतू होता. त्यासाठी निवडक 100 म्हणींचे पर्याय देण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वयाची अट नसल्याने शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. स्पर्धेचा विस्तृत निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर (http://rmvs.in/) जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. आनंद काटीकर यांनी दिली. विजेत्यांना आकर्षक अशी रोख पारितोषिके देण्यात येणार असून सोबत पुस्तकांचा संचही भेट मिळणार असल्याचेही डॉ. काटीकर यांनी सांगितले. 

प्रौढकथा अंतिम निकाल :

विजेत्या स्पर्धकाचे नाव                 पारितोषिक क्रमांक
    
शिल्पा शेडगे (अंधेरी, मुंबई)                  प्रथम

दीप्ती सिधये (पुणे)                              व्दितीय

श्रुती अशोक भामरे (नाशिक)                 तृतीय

संध्या यादवाडकर (मुलुंड, मुंबई)            चतुर्थ

शिल्पा दयानंद गंजी (वांद्रे, मुंबई)            पंचम

बालकथा अंतिम निकाल :

स्नेहजीत वाघ (परळ, मुंबई)                  प्रथम

विनय दिलीप खंडागळे (बुलढाणा)          व्दितीय

श्रेया श्रीहरी पर्वते (पुणे)                         तृतीय

माधव मुकुंद कुलकर्णी (औरंगाबाद)         चतुर्थ

चेतन व्यंकटेश कोटबागे (बेळगाव)          पंचम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com