कुत्र्याचा वृद्धेला चावा

वृद्धेला कुत्र्याने चावा घेतला
वृद्धेला कुत्र्याने चावा घेतला

अलिबाग : येथील मासळी बाजाराशेजारी आज सकाळी शुभा दत्तात्रय राणे (72) या वृद्ध महिलेला भटक्‍या कुत्र्याने चावा घेतला. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. 

मासळी बाजार रस्त्यावर ही वृद्ध महिला भाजी विक्रीसाठी बसली होती. अचानक आलेल्या कुत्र्याने तिच्या डाव्या मांडीला चावा घेतल्याने ती जोरजोरात ओरडू लागली. त्यामुळे या भागात खळबळ माजली. जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. 
भटक्‍या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेने सहा महिन्यांपूर्वी मोहीम सुरू केली होती. त्यानंतरही या कुत्र्यांची संख्या अटोक्‍यात आली नाही. 
 
अलिबाग शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी नसबंदी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियेला गुरुवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे. मासळी बाजारात स्वच्छता राखण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. 
- प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com