गणेशपुरी, वज्रेश्वरी व अकलोली तीर्थक्षेत्रांमध्ये स्ट्रीट लाईट बंद

 दीपक हिरे
सोमवार, 8 एप्रिल 2019

वज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रामध्ये कित्येक महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहे त्यामुळे येथील परिसर अंधकारमय झाला आहे त्यामुळे येथील नागरिक,व भाविकांची रात्री च्या वेळेस मोठी गैरसोय होत आहे दरम्यान या परिसरात गणेशपुरी,वज्रेश्वरी व अकलोली या तीर्थक्षेत्र तीन ग्राम पंचायत अंतर्गत आहे येथील स्ट्रीट लाईट बाबत

ठाणे जिल्हा परिषद लाईट बिल भरायची पण जिल्हा परिषदेने बरीच वर्षे वीज वितरणाचे बिल न भरल्यामुळे या तिन्ही तीर्थक्षेत्र मधील तिन्ही गावचे रसत्याची स्ट्रीट लाईटचे कनेकशन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या वज्रेश्वरी गणेशपुरी व अकलोली ही तिर्थस्थळी असूनही अंधारात आहेत. मात्र याबाबत स्थानिक प्रशासनाने कुठलीही उपाय योजना न केल्याने ही गावे रात्री अंधारात आहेत. सध्या वज्रेश्वरी येथे वासंतिक नवरात्र उत्सव सुरू असून, रात्रीच्या वेळेस येथील देवस्थानला अंधाराचा गराडा पडला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर या ठिकाणी आशा मूलभूत सुविधांचा वानवा असल्याने भाविकांची संख्या रोडावली आहे

या लाईट समस्येबाबत गेल्या महिन्यात दुगाड फाटा येथे झालेल्या आमसभेत हा विषय काही ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र अद्याप त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतली गेल्यामुळे येथील तिन्ही गावांतील स्ट्रेट लाईटचा प्रश्न कोण सोडवेल असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शासनाने याबाबत काही मदत करून उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे

Web Title: Street lights are closed in Ganeshpuri, Vajreshwari and Akloli pilgrimage areas

टॅग्स