गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

जुन्या नोटा बदलून देताना अथवा जमा करताना बॅंकांनी गैरप्रकार रोखण्यासाठी अधिक दक्ष राहावे. बॅंकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
- रिझर्व्ह बॅंक

मुंबई - देशभरात पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी कोट्यवधी लोक बॅंकांत गर्दी करीत असताना बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी बॅंकांना दिले.

रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की काही ठिकाणी बॅंक शाखांमध्ये कर्मचारी व अधिकारी काही लोकांना हाताशी धरून गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जुन्या नोटा जमा करणे अथवा बदलून देताना हे गैरप्रकार होत आहेत. जुन्या नोटा बदलणे अथवा जमा करताना बॅंकेचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार करू नयेत. बॅंकांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा बदलून अथवा जमा करण्याचे तपशील अगदी कमी कालावधीत सादर करण्यासही सांगण्यात येईल.

Web Title: Strict action against those who make the irregularities