दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 जणांवर कडक कारवाई  

रविंद्र खरात 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहन चालकांचे लायसन्स 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच 225 वाहन चालकांवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र नवीन वर्षात जनजागृती सोबत कठोर कारवाईचे संकेत दिले असून, दारू पिऊन वाहन चालविताना सापडल्यास वाहन चालकांचे 6 महिने लायसन्स निलंबित करण्यात येणार असल्याचे संकेत आरटीओने दिले आहेत. 

वाहन चालकांनी दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अनेक अपघात होत असल्याचे विविध अहवालातुन निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील वर्षात 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत धडक कारवाई झाली. यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहन चालकांचे 3 महिन्यासाठी लायसन्स निलंबित करण्यात आले असून, 225 दारू पिऊन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई प्रस्तावित कल्याण आरटीओने केली आहे.

नवीन वर्षात शिक्षेत वाढ ...
नुकतीच राज्य सुरक्षा परिषदेची महत्वाची बैठक परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत पार पडली. यात बेशिस्त वाहन चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आले. यापुढे दारू पिऊन वाहन चालविल्यास त्या वाहन चालकाचे लायसन्स 6 महिन्यासाठी निलंबित करा असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले. त्याची आगामी वर्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दारू पिऊन वाहन चालवीत असलेल्या वाहन चालक विरोधात मागील वर्षात वाहतूक पोलिसांची कारवाई शिफारस आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई केली संबधित वाहन चालकांचे लायसन्स 3 महिन्यासाठी निलंबित केले असून यापुढे दारू पिऊन वाहन चालविल्यास त्या वाहन चालकाचे लायसन्स 6 महिन्यासाठी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली .

Web Title: Stricter action on 409 people driving and drinking alcohol