पालघरमध्ये भारत बंद यशस्वी

नीरज राऊत
सोमवार, 2 एप्रिल 2018

पालघर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार निवारण आणि प्रतिबंध अधिनियम 1989 च्या कायद्यात व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांनी सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून हा कायदा शिथिल करण्याच्या निर्धाराच्या निषेधार्थ समविचारी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेमध्ये भूमिसेना, आदिवासी एकता परिषद व आदिवासी श्रमिक महिला मंडळ सहभागी झाले होते. या संस्थांनी पुकारलेल्या बंदच्या हाकेला पालघरमधील व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिल्याने शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

या बंदमध्ये पालघर भाजी मार्केट, मासळी मार्केट, बाजारपेठ, घाऊक बाजारपेठ, दुकाने, हॉटेल, कॅन्टीन, खाद्य पदार्थांचे स्टॉल आदी सहभागी झाले. मात्र शाळा, महाविद्यालय, औद्योगिक आस्थापने, रिक्षा, एस.टी. सेवा व रेल्वे सुरळीतपणे सुरू असल्याने बंदची तीव्रता सर्वसामान्य नागरिकांना जाणवली नाही. हा बंद लोकशाहीच्या माध्यमातून अहिंसक मार्गाने पाळण्याचे आयोजकांनी जाहीर केले होते तरी शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरामधील आस्थापने बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी तरुण व महिला कार्यकर्त्यांनी बाजारपेठेमध्ये फेरी मारल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद पालघर वासियांनी दिला.

Web Title: strike successful in palghar