esakal | ...असे झाल्यास 'बेस्ट'ला शह देण्यासाठी राज्य सरकारचा पर्यायी विचार

बोलून बातमी शोधा

best

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वाहतूकीची सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळाला नसल्याने कामगार नेते शशांक राव यांनी सोमवार पासून बेस्टचे कामबंद करण्याचा इशारा दिला आहे.

...असे झाल्यास 'बेस्ट'ला शह देण्यासाठी राज्य सरकारचा पर्यायी विचार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वाहतूकीची सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळाला नसल्याने कामगार नेते शशांक राव यांनी सोमवार पासून बेस्टचे कामबंद करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यावर राज्य सरकारने मार्ग काढून बेस्टला शह देण्यासाठी एसटीचा पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही वेळी मुंबईतील सेवेसाठी दाखल होण्याचे आदेश येण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी आणि बेस्ट प्रशासनाची सेवा सुरू आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना, सरकारी कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याची सुरक्षा दिली आहे. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांना विम्याचे सवरंक्षण मिळत नसल्याने कामगार नेते शशांक राव संतापले आहेत. अशा आपात्कालीन परिस्थितीत बेस्ट सेवा बंद झाल्यास राज्य सरकारने तात्काळ एसटीचा पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी आधीच मुंबई, ठाणे, पालघर येथील कर्मचारी कामावर येत नसतांना आता, मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी ग्रामीण भागातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा : 'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी ?' घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र  मद्यप्रेमींची घालमेल सुरू.. 

दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी एसटीचे कर्मचारी कमी पडत आहेत. बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जेवनाची आणि राहायची सुद्धा विशेष सोय नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा देण्यासाठी बोलवल्यास कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा विमा सुरक्षेची मागणी
एसटीचे सुमारे 1500 कर्मचारी सध्या मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संघंटनांनी 50 लाखांचा विम्याचे सरंक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, अद्याप त्यावर राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने निर्णय घेतला नाही. 

कोरोना सारख्या संसर्गजन्य परिस्थितीत काही बेस्ट कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला तर शंभर पेक्षा जास्त बेस्ट कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. मात्र, राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामूळे सोमवार पासून कर्मचारी घरी बसून स्वत:ची सुरक्षा करण्यात काय गैर आहे?
- शशांक राव, कामगार नेते.

ST's option to give the BEST BY State Government, under consideration