एसटीची विश्रांतीगृहे अद्ययावत होणार ; कर्मचाऱ्यांना मिळणार एसीसह स्वतंत्र बेड 

ब्रह्मा चट्टे
रविवार, 1 जुलै 2018

मुंबई : एसटी परिवहन विभागाच्या विश्रांतीगृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आल्याकडे "सकाळ'ने लक्ष वेधले होते. यामुळे महामंडळाकडून तात्काळ पावले उचलत वाहक-चालकांच्या समस्या दूर करण्यासाठी विश्रांतीगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा आराखडा महामंडळाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. लवकरच विश्रांतीगृहांचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन विभागाचे (स्टेट ट्रान्सपोर्ट) 253 बस डेपो आहेत. यापैकी मुंबई विभागात मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला- नेहरूनगर, पनवेल, उरण या पाच ठिकाणी बस डेपो आहेत. या बस डेपोंच्या ठिकाणी परगावाहून आलेल्या एसटीच्या वाहक-चालकांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली असते. राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आले आहे. यामुळे चालक-वाहकांची पुरेशी झोप होत नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्‌भवत असल्याची तक्रार एसटीच्या चालक-वाहकांनी केली होती.

"सकाळ'ने या समस्येकडे लक्ष वेधणारी "विश्रांतीगृहे की कोंडवाडा' अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महामंडळाला जाग आली असून, विश्रांतीगृहे अद्ययावत करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

असे असेल नवे विश्रांतीगृह 
- संपूर्ण वातानुकूलित व्यवस्था 
- वाहक-चालकांना स्वतंत्र बेड 
- बेडच्या जवळच लॉकर 
- जेवण करण्यासाठी वेगळा डाईनिंग टेबल 
- बाथरूम, स्वच्छातागृहांची संख्या वाढवणार.

Web Title: STs rest houses will be updated