एसटीची ‘स्मार्ट’ नोंदणी रखडली

file photo
file photo

मुंबई : एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना विविध प्रकारच्या २९ सवलती दिल्या जातात. त्यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी अनिवार्य केली आहे. मात्र, राज्यातील अनेक आगारांमध्ये प्रवाशांसाठी स्मार्ट कार्डसाठी आवश्‍यक मशीन उपलब्ध नाहीत. तांत्रिक बिघांडामुळेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यातील २५० आगारांमध्ये स्मार्ट कार्ड योजनेची नोंदणी सुरू आहे. सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिक आगारांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, त्या तुलनेत एसटीकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करणारे मशीन नसल्याने प्रवाशांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. 

स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी ट्रायमॅक्‍स कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, कंपनीकडून मशीनचा अपूर्ण पुरवठा करण्यात आल्याने राज्यात स्मार्ट कार्ड योजनेच्या बोजवारा उडाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी तालुक्‍याला जावे लागते. मात्र, मशीन नसल्याने त्यांना नोंदणी न करताच परत यावे लागत आहे. स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये शुल्क आहे. मात्र, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी रोजच्या प्रवासातच प्रवाशांना आर्थिक फटका बसतो आहे.
- नारायण जाधव, उपसरपंच, क्षेत्रमाऊली, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com