विद्यार्थी आंदोलनामुळे पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबईहून पुण्याला निघालेल्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्‍सप्रेस, डेक्कन एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍सप्रेस, कोयना एक्‍सप्रेस या गाड्या मंगळवारी दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान पोचल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन एक्‍सप्रेस या गाड्या दुपारी दीड नंतर टप्प्याटप्प्याने मुुंबईला पोचल्या

पुणे  - मुंबईत कुर्ल्याजवळ झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुणे- मुंबई मार्गावरील वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली. पुण्याहून मुंबईला पोचणाऱ्या गाड्या सुमारे तीन तास तर, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्या तब्बल चार तासांनी पोचल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. 

मुंबईहून पुण्याला निघालेल्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्‍सप्रेस, डेक्कन एक्‍स्प्रेस, उद्यान एक्‍सप्रेस, कोयना एक्‍सप्रेस या गाड्या मंगळवारी दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान पोचल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन एक्‍सप्रेस या गाड्या दुपारी दीड नंतर टप्प्याटप्प्याने मुुंबईला पोचल्या. कुर्ल्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या अनेक मार्गांवरील सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. मुंबई- नाशिक मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाल्याचे समजते. 

Web Title: student agitation in mumbai