ट्रेकिंगवेळी पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

बदलापूर - स्काऊट गाईडच्या शिबिरादरम्यान डोंगरावरून पाय घसरून पडल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाली. पूर्वा गांगुर्डे (वय १५) असे मृताचे नाव असून, ती बदलापूर येथील कात्रप विद्यालयात दहावीत शिकत होती. 

या दुर्घटनेत जखमी झालेल्या अपूर्वा खरातवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूर पूर्वेतील कात्रप विद्यालयाच्या नववी आणि दहावीच्या स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांचे शिबिर कात्रप परिसरातील डोंगरावर होणार होते. सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. ८ वाजता डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यावर त्यांनी पुन्हा उतरण्यास सुरुवात केले; मात्र उतारावर पाय घसरल्याने पूर्वा आणि अपूर्वा घरंगळत गेल्या. त्यामुळे दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात पूर्वाचा मृत्यू झाला.

Web Title: Student death due to trekking