पिकअप टेम्पोच्या धडकेत विद्यार्थी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील वसई-पारोळ रोडवरील खेमीसती कापड डाईंगसमोर एका भरधाव पिकअप टेम्पो गाडीने एका शालेय विद्यार्थ्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होत असतात, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.

अकित केशरीलाल गुप्ता (१३, रा. मीठपाडा, शेलार भिवंडी) असे अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नदीनाका येथील जीवन ज्योती हिंदी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. या अपघातप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक राजेश प्रजापती यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. मृत अंकित हा शाळा सुटल्यानंतर रस्त्याने पायी घरी निघाला होता. त्या वेळी टेम्पोची धडक लागून टेम्पोचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने अंकित जागीच ठार झाला.

वाहतूक पोलिसांचा येथे कायम बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी पोलिस व तहसीलदार यांच्याकडे अनेक वेळा केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम भोईर यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student kills in accident