विद्यार्थ्यांना दिला गेल्या वर्षीचाच पेपर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - परीक्षांच्या निकालास विलंब, पेपरफुटी आदी कारणांमुळे चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या सत्राची स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स या विषयाची परीक्षा मंगळवारी (ता. 22) झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीचाच पेपर देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या परीक्षेला चार हजारांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. मंगळवारी झालेल्या या परीक्षेदरम्यान गेल्या वर्षी 7 डिसेंबरला घेण्यात आलेल्या परीक्षेचाच पेपर देण्यात आला, अशी माहिती सिनेट सदस्य प्रा. वैभव नरवडे यांनी दिली. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: student lase year exam paper