नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - देशभरात नीटची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा सीबीएसई बोर्डाने केला आहे. मात्र मुंबई वगळता काही ठिकाणी उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना दिरंगाईचा फटका बसला. हे प्रमाण अत्यल्प असले तरीही मुंबईसह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर तणावाच्या वातावरणातच परीक्षा पार पडली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने  खबरदारी घेतली होती. 

देशभरातील विविध केंद्रांत नीटच्या परीक्षेसाठी सुमारे १३.२६ लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाने ड्रेसकोड जाहीर केला होता. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा बसू देण्यात येणार नाही, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दोन-पाच मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला. 

विद्यार्थ्यांच्या कॉलर कापल्या
पुण्यात कॉलरचे शर्ट घातलेल्या विद्यार्थ्यांच्या कॉलर कापण्यात आल्या. त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. बुलढाण्यात प्रश्‍नपत्रिकाच पोहोचली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. परीक्षेसाठी वेळ कमी पडला तसेच भौतिकशास्त्राचाही पेपर कठीण गेल्याची तक्रार विद्यार्थी करत होते.

Web Title: The students of the fair exam