esakal | पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आठवड्यातील पाच दिवस शालेय पोषण आहार
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आठवड्यातील पाच दिवस शालेय पोषण आहार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू झाल्या असल्याने शालेय पोषण आहाराअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस हेल्दी पोषण आहार दिला जावा अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्याचे कंत्राट जालना येथील दिव्या एस.आर.जे.फूड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे. एका वेळी विद्यार्थ्यांना 24 दिवसांसाठी हा पोषण आहार दिला जाणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या हेल्दी आहारात तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठीसाखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्यात येणार आहेत. शिवाय हे आकर्षक पद्धतीने सीलबंद पाकिटातून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय आणि कटकमंडळ शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचे वाटप केले जाणार आहे. शाळांनी पुरवठादाराकडे मागणी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत शाळास्तरावर न्युट्रीटीव्ह स्लाईसचा पुरवठा होणे बंधनकारक असून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top