‘तो’ झाकोळला! त्यांच्यासाठी होतं सगळं काही नवीन...

‘तो’ झाकोळला! त्यांच्यासाठी होतं सगळं काही नवीन...
‘तो’ झाकोळला! त्यांच्यासाठी होतं सगळं काही नवीन...

नवी मुंबई : सकाळचा गारवा, ढगाळ वातावरण आणि झाकोळलेला सूर्य पाहण्याची शिगेला पोहोचलेली उत्कंठा अशा वातावरणात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. आकाशात सूर्याभोवती हळूहळू कलेकलेने सरकणारा चंद्र आणि काही क्षणात सूर्य कसा गिळंकृत होतो, हा निसर्गाचा आविष्कार पाहण्याचा अनुभव घेतला. या प्रसंगी "कुतूहल सायन्स ऍक्‍टीव्हिटीज' या संस्थेच्या सदस्यांनी सूर्यग्रहणाबाबत समाजातील चुकीच्या परंपरा आणि गैरसमजाबाबत विद्यार्थ्यांना ज्ञान दिले. 

1980ला भारतात झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणानंतर पहिल्यांदाच संपूर्ण देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण झाले. सूर्यग्रहणाबाबत समाजात असणाऱ्या चालीरिती, रूढी-परंपरा आणि गैरसमजुती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, याकरिता नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील ऍम्फी थिएटरमध्ये खास महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी सूर्यग्रहण पाहण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. सकाळी दिसणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. सूर्यग्रहण प्रत्यक्ष सुरक्षितरित्या पाहता यावे, याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविलेल्या 4 हजार 862 चष्म्यांचे वाटप शिक्षण विभागामार्फत शाळांना करण्यात आले. तसेच "कुतूहल सायन्स ऍक्‍टीव्हिटीज' या संस्थेमार्फत सूर्यग्रहणाबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, गैरसमज याबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष सूर्यग्रहण कसे पाहावे व त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

नुसत्या डोळ्याने सूर्यग्रहणाचे निरीक्षण करू नये. खरे तर तेजाने तळपत असलेल्या सूर्याकडे नुसत्या डोळ्याने पाहिल्यास एरवीही घातक ठरू शकते, असे "कुतूहल संस्थे'च्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या उपक्रमाचा लाभ नवी मुंबई महापालिका शाळांतील इयत्ता 1ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतला. नवी मुंबई महापालिकेने असा अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल पालकांच्या वतीने; तसेच नागरिकांतर्फे प्रशंसा करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com