विद्यार्थ्यांनी I.A.S बनण्याची इच्छा मनामध्ये बाळगावी -  निधी चौधरी

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मुंबादेवी: "लाल दिवा मिळवण्यासाठी नाही तर लोकांच्या हृदयामध्ये ज्ञानाचे दिवे उजळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी I.A.S बनण्याची इच्छा मनामध्ये बाळगावी” असे उपस्थित विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना मनपाच्या स्पेशल उपायुक्त निधी चौधरी यांनी सांगितले. निमित्त होते ते एस.एन.डी.टी. विद्यापीठात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटनाचे.

एस.एन.डी.टी. विद्यापीठाशी सल्लग्नित श्रीमती एम.एम.पी.शाह आर्टस अॅण्ड कॉमर्स महिला महाविद्यालयामध्ये प्राचार्या डॉ. लीना राजे व व्यवस्थापकीय मंडळ यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रस्थापित करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन डॉ. शशिकला वंजारी, कुलगुरू, एस.एन.डी.टी.विद्यापीठ व श निधी चौधरी (IAS) उपायुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे व्यवस्थापकीय सदस्य मंडळ, इतर मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणामध्ये निधी चौधरी म्हणाल्या “I.A.S परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते म्हणजेच ती एकाच वर्षात पास केली जावू शकते. आपल्या अध्यक्षीय भाषणात एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर डॉ. शशिकला वंजारी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व असे अभिनव उपक्रम करणारे हे कॉलेज खूप छान काम करत आहे असे सांगितले. मुलींना मार्गदर्शन करताना त्यापुढे म्हणाल्या, या ट्रेनिंगचा उपयोग करून आयुष्यात I.A.S नाही बनता आलं तरी चालेल पण आपण मार्ग शोधून यशस्वी वाटचाल करा. हे केंद्र कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मार्गदर्शनापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोलाचे वरदान ठरणार आहे. कारण इतर केंद्रांपेक्षा आमच्या या केंद्रात विद्यार्थ्यांना बरीच कमी फी आकारण्यात येणार आहे असेही वंजारी म्हणाल्या.

Web Title: Students should be willing to become I.A.S - Nidhi Chaudhary