विद्यार्थी होणार अवयवदाता

विद्यार्थी होणार अवयवदाता

मुंबई - विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ते अवयवदाता असल्याची नोंद करण्याला परवानगी मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी जोडलेल्या एक लाख विद्यार्थ्यांच्या आयडीवर ही माहिती नमूद करण्यात येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन केंद्राने विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ऑर्गन डोनर असल्याची नोंद करण्यासाठी केलेल्या मागणीला वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली.येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील एक लाख विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ते अवयवदाता असल्याची नोंद करण्यात येईल; तर मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५०० महाविद्यालये व नाशिक विद्यापीठाशी संलग्न ३०० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या आयडीवर नोंद होण्यासाठी पुढच्या टप्प्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठामार्फत किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून राज्यपालांची परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू
नियमानुसार १८ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास अवयवदान करता येते. तसेच रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू या वयोगटातील व्यक्तींचे असतात. हा कमावता वर्ग असल्याने घराबाहेर असल्याचे लक्षात घेण्यात आले आहे. तसेच रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे तरुण मुलांचे होतात. अनेकदा जखमी झालेल्या रुग्णाला मेंदू मृत जाहीर करण्यात आल्यानंतर अवयवदानासाठी त्यांच्या नातेवाईकांना समजावणे कठीण होऊन जाते. अशा मानसिक स्थितीत त्यांच्या जवळच्या व्यक्तीचीच तशी इच्छा असल्याने ते निर्णय घेण्यासाठी तयार होतात हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदाता असल्याची नोंद करणे सोपे होईल

ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदाता असल्याची नोंद करावी म्हणून गृह विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जो प्रस्ताव कायदे आणि विधी विभागाकडे पाठवण्यात आला. त्या वेळी अवयवदानाबाबतच्या कायद्यांविषयी फारशी माहिती नसल्याने निर्णय घेतला गेला नाही. आता मात्र याबाबत जागृती झाली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आय कार्डवर अवयवदाता म्हणून नोंद झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवर नोंद होण्याची प्रक्रिया मार्गी लागेल. सर्वाधिक मृत्यू हे ड्रायव्हरचे होत असल्याने अशी नोंद केल्यास अवयवदानाचा टक्का वाढवण्यास मदत होईल.
- डॉ. प्रवीण शिनगारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com