स्टुडिओ घोटाळा प्रकरण; सोमय्यांचा ताफा मढमध्ये दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

स्टुडिओ घोटाळा प्रकरण; सोमय्यांचा ताफा मढमध्ये दाखल

मुंबई : मुंबईतील मढच्या दिशेने निघालेल्या भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या ताफ्याला पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. कथित स्टुडिओच्या घोटाळ्याप्रकरणी ते स्टुडिओची पाहणी करण्यासाठी गेले असल्याची माहिती आहे. यामध्ये एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरिट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला असून अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं जात आहे.

मढ येथे असलेल्या स्टुडिओमध्ये अनाधिकृत बांधकाम केले असून जवळपास एक हजार कोटींचा यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांकडून केला होता. यामध्ये अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले असून भाजपच्या शिष्टमंडळाचा ताफा पाहणीसाठी आला असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं आहे. त्यानंतर तेथील खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये सोडलं आहे. त्याचबरोबर हे अनाधिकृत बांधकाम अजून का पाडण्यात आलं नाही असा सवाल सोमय्या यांनी पालिका अधिकाऱ्यांना केला आहे.

हेही वाचा: Freebies Issue : गुंतागुंतीचे प्रकरण 3 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग

समुद्रकिनारी बांधलेल्या स्टुडिओत सीआरझेड नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केली आहे. तात्कालीन पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या घोटाळ्यात सामावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा: बाळाला कडेवर घेऊन चालवतो सायकलरिक्षा; Video पाहून गहिवरले नेटकरी

स्टुडिओ घोटाळा नेमका काय? सोमय्यांनी कोणते आरोप केले?

  • मुंबईतील मढ येथे बेकायदा ५ स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक हजार कोटींचा घोटाळा झाला आहे.

  • स्टुडिओ उभारताना सीआरझेड नियमांचं उल्लंघन झालं.

  • समुद्रात स्टुडिओ उभारले पण कागदोपत्री ही जागा समुद्रापासून दूर असल्याचं दाखवलं.

  • २०१९ मध्ये येथे काहीही नव्हतं पण २०२१ मध्ये येथे स्टुडिओ उभारण्यात आले.

  • पर्यावरण खात्याने ६ महिन्यासाठी सेट उभारण्याची परवानगी दिली होती पण कांदळवन तोडून स्टुडिओ उभारले

  • अस्लम शेख यांच्या आशिर्वादाने घोटाळा झाला, या जागेवर आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती.

Web Title: Studio Fraud Bjp Kirit Somaiya Present Madh Aditya Thackeray Aslam Shaikh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..