हार्बर रेल्वेमार्गावर स्टंटबाजी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

लोकलमध्ये चित्तथरारक स्टंट करून जीव धोक्‍यात घालणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडीदरम्यान दोघे लोकलच्या दरवाजातून बाहेर लटकत विजेच्या खांबांना हात मारत ‘स्टंटबाजी’ करत असतात. वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन, कारवाई करणार असल्याची माहिती दिली. 

वडाळा -  लोकलमध्ये चित्तथरारक स्टंट करून जीव धोक्‍यात घालणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते शिवडीदरम्यान दोघे लोकलच्या दरवाजातून बाहेर लटकत विजेच्या खांबांना हात मारत ‘स्टंटबाजी’ करत असतात. वडाळा रेल्वे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन, कारवाई करणार असल्याची माहिती दिली. 

लोकलमधून प्रवास करताना कोणी स्टंट करू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस आणि विविध संस्था एकत्र येऊन वारंवार जनजागृती करीत असतात. तरीही अशी स्टंटची उदाहरणे समोर येत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत म्हणाले की, स्टंटबाजांवर कडक कारवाई केल्यास इतरांना चाप बसेल. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी स्टंटबाजांविरोधात पालक व प्रवाशांच्या सहकार्याने नव्याने विशेष मोहीम राबवणे गरजेचे झाले आहे. स्टंटबाजांवर गुन्हा नोंदवून कडक कारवाई केली जाईल, असे वडाळा लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल  यांनी सांगितले.

Web Title: Stunts on the Harbor Railline