चोरीच्या मोटरसायकलवरून सागरी सेतूवर स्टंटबाजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - मोटरसायकलची चोरी करून सागरी सेतूवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली. अल्तमश मोईन शेख असे त्याचे नाव आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

वांद्रे परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या मोटरसायकलची सोमवारी सागरी सेतूच्या गणपती विसर्जन स्थळाजवळ चोरी झाली होती. याबाबत त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सागरी सेतू परिसरात स्टंटबाजीचे प्रकार रोखण्याकरिता वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (ता. 8) पहाटे वांद्रे पोलिसांचे पथक सेतू परिसरात गस्त घालत असताना अल्तमश हा सेतू परिसरात वेडेवाकडे वळण घेत मोटरसायकल चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याच्याकडील मोटरसायकल चोरीची असल्याचे उघड झाले. या मोटरसायकलची चोरी त्याने गणपती विसर्जन स्थळाजवळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Stunts at the Marine Set from the stolen motorcycle