बलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नवी मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक अमित शेलार याने केलेल्या अर्जावर न्या. इंद्रजित मोहंती आणि न्या. एस. एस. जाधव यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. ९) सुनावणी झाली. हा अर्ज योग्य न्यायालयात सादर करावा, असे खंडपीठाने सांगितले. शेलार याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळला होता.

नवी मुंबईतील ३१ वर्षांच्या हवालदार महिलेने शेलार याच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली आहे. मार्च २०१७ मध्ये शेलार यांनी दिलेले शीतपेय प्यायल्यानंतर आपल्याला गुंगी आली. त्या वेळी त्याने बलात्कार केला आणि त्या कृत्याचे चित्रीकरण करून चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. त्यानंतर त्याने अनेकदा लैंगिक शोषण केले, असेही तक्रारीत नमूद आहे.

‘पतीच्या दबावामुळे तक्रार’
हवालदार महिलेच्या पतीला अमित शेलार आणि तिची मैत्री आवडत नव्हती. पोलिस असल्याने तिला कायदेशीर बाबींचे ज्ञान आहे. केवळ पतीच्या दबावामुळे तिने तक्रार दाखल केली आहे, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.

Web Title: In the sub inspector high court for bail in the rape case